महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रेरणादायी विचार, संदेश, इमेज आणि कोटस आपल्या प्रियजनांना सेंड करा
Mahatma Gandhi Death Anniversary – inspirational messages, images and quotes या पोस्टमध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे थोर विचार आणि त्यांची शिकवण बघणार आहोत. ह्या पोस्टमध्ये असलेले फोटोज, इमेजेस तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करून आपल्या प्रियजणांना सेंड करू शकता. आम्हाला आशा आहे कि महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्य मिळवुन दिले. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने त्यांची हत्या केली आणि तेव्हापासून त्यांची पुण्यतिथी दरवर्षी भारतात शहीद दिन म्हणून पाळली जाते. हा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला जातो. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला.
महात्मा गांधीजींची शिकवण आणि कृती आजही लोकांवर प्रभाव पाडत आहे. सत्य, अहिंसा आणि करुणा त्यांचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या जीवनावरून आणि त्यांच्या शिकवणीमधून शिकता येणारे धडे आपण घेतले पाहिजेत.
Mahatma Gandhi Death Anniversary – महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम
Mahatma Gandhi Death Anniversary – महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम
अहिंसेचे पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक असते आणि ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. महात्मा गांधीजींच्या मते, जर अहिंसा भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरण्यात येत असेल तर प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही.
महात्मा गांधीजींचे जीवन हा आत्मशोध, नेतृत्व आणि मानवतेच्या सेवेचा एक उल्लेखनीय प्रवास होता. त्यांनी आपले जीवन भारतीय स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. त्यांच्या अहिंसक तत्त्वज्ञानाने जगभरातील स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिली. महात्मा गांधी हे एक आध्यात्मिक नेते होते. प्रतिकूल परिस्थिती आणि विरोध पत्करूनही ते आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले आणि मानवतेच्या उन्नतीसाठी परिश्रम करत राहिले. महात्मा गांधीजींचे जीवन आणि त्यांची शिकवण हे सत्य, अहिंसा, करुणा, शांती तसेच इतरांच्या प्रति प्रेम आणि सेवेची भावना याचा संदेश देते.
महात्मा गांधींचे मानवतेसाठीचे योगदान आणि जगावर त्यांचा प्रभाव लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा आणि भारताला जगात एक चांगले स्थान मिळवून देण्याचा संकल्प करण्याचा आजचा हा दिवस आहे. अश्या ह्या थोर व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या विचारसरणीला कोटी कोटी प्रणाम. अशाच inspirational messages, images and quotes साठी bestquoteslibrary.com ला भेट द्यायला विसरू नका.
जय हिंद! जय भारत!
जय जवान जय किसान!