जागतिक व्याघ्र दिन हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी 29 जुलै रोजी वाघांच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी International Tiger Day हा साजरा केला जातो.
माणसाने या आधुनिकतेच्या नावाखाली खूप जंगलतोड केली आहे. जंगल हे या प्राण्यांचे घर आहे. माणसांच्या गावांची आणि आधुनिक शहरांची वेश खूपच वृंदावत गेली आहे हो अगदी ती जंगलांच्या वेशीपर्यंत गेली आहे त्यामुळे जंगलातील जनावरंसुद्धा माणसांच्या वस्तीत येऊ लागली आहेत. पण आपणच त्यांच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे हे देखील विसरून चालणार नाही. राखीव जंगलतोड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे
वाघ हा आपल्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहे. हेच वाघ तृणभक्षी प्राण्यांची संख्या नियंत्रित करून निसर्गाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे अति चराईवर आळ बसतो आणि जंगलांतील मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांचा समतोल नीट राखला जातो.
जागतिक व्याघ्र दिन हा या प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या प्रति आपली जी जबाबदारीची आहे तिची आठवण करून देतो.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यास कधी सुरुवात झाली?
२९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.











